[The translation into Marathi
– a publication from Pune – was done in 1948 by P.S. Sane Guruji. There
appears to be one more translation of few selections of Tirukkural in
Marathi, published in the 80s by the Ministry of Information and
Broadcasting, Government of India. The translator was Ravindra Kumar Seth who authored a
book called `Tirukkural’ for children. He has done it Hindi as well as
Marathi (Seth, 1981).
There is an interesting
history behind the Marathi translation. Sane Guruji, a popular writer and great
patriot, translated the Kural in 1930 while he was a political prisoner in
the Tiruchirappalli jail (Joshi, 1973). He is
said to have used the V.V.S. Ayyar’s English translation of the Kural as the
basis. It took nearly 18 years for the work to get published, but a second
edition appeared in 1960 and a reprints of the same appeared in 1975 and 1987.
Sane Guruji’s translation is a complete translation of the entire Kural. The
1987 reprint is still available for sale at the Continental Prakashan
(publishers), Vijayanagar, Pune - 411 030. Yet again my wife, K.T.
Shahnaz, has taken all the efforts to convert the text into the
electronic form in Unicode.
References:
Seth, R.K. 1981. तिरुक्कुरल (तमिल का गौरव-ग्रन्थ) ; प्रकाशन विभाग, सूचना और प्रसारण मंत्रालय, भारत सरकार. 58
pages
Joshi, S. 1973. Marathi
Translation of Tirukkural. In: First All India
Tirukkural Seminar Papers 1972 (Editor: N. Sanjeevi). University of
Madras.
Pp 50-55]
पुस्तकाचा नि ग्रंथकर्त्याचा परिचय
ज्याला आपण तामीळनाड प्रांत म्हणून संबोधतो त्यात तुंगभद्रेच्या दक्षिणेकडचा
पुष्कळसा प्रदेश येतो. विशेषत: कावेरी नदीच्या आसमंतातचा सर्व भाग त्यात
येतो. एकीकडे आंध्र देश, एकीकडे कर्नाटक, एकीकडे मलबार याला जोडून आहेत. या
तामीळनाड प्रदेशात मूळ द्राविडी संस्कृती होती. द्राविड संस्कृती फार
प्राचीन आहे. किती प्राचीन ते नीट सांगता येणार नाही. द्रविड लोक लष्करी
पेशाचे होते. लढाई करणे म्हणजे त्यांना आनंद वाटे. एका गाण्यात एक द्राविड
स्त्री म्हणते, "माझा मुलगा कोठे आहे म्हणून तुम्ही विचारता? तो कोठे आहे
ते मला माहीत नाही, परंतु रणांगणावर तो आकस्मात दिसेल. कारण माझ्या
उदर-दरीतून बाहेर पडलेला तो वाघ आहे." अशा शूर वीरांना जन्म देण्यात
द्राविड मातांना धन्यता वाटे.
पुढे आर्य लोक दक्षिणेकडे आले. त्यांनी आपल्याबरोबर स्वत:ची संस्कृतीही आणली.
आर्य ल्प्क जेते म्हणून आले नाहीत, तर शिक्षक व आचार्य म्हणून आले. आलेल्या
आर्यांना "कोमल स्वभावाचे व वेद-द्रष्टे" असे संबोधण्यात येई. ब्राह्मण,
जैन व बुद्ध तिन्ही धर्मांचे लोक आपापली नीतितत्तचे नि संस्कृती घेऊन खाली
दक्षिणेकडे येऊ लागेल. तामीळ संस्कृतीचा मूळचा पाया द्राविडी आहे, परंतु
वरची भव्य इमारत अर्य संस्कृतीची आहे. या तिन्ही धर्मांच्या पंडितांनी
तामीळ वाङ्मयात उदार विचार ओतले, नवीन संस्कृती पुलविली. ब्राह्मण, जैन आणि
बुद्ध पंडितांनी या प्रदेशात विद्यापीठे स्थापिली; साहित्यसंघ निर्माण केले;
ग्रंथालये सजाविली; आणि तामीळ भाषेला भव्यता, श्रेष्ठता नि स्थिरता दिली.
तामीळ भाशा
संस्कृतइतकी प्राचीन आहे.
खिरस्तशकापूर्वीही तामीळ भाषेत अनेक ग्रंथ रचिले होते. तामीळ भाषेचा
संस्कृतशी मुळी संबंध नाही. संस्कृतचा ग्रंधही नसलेली अशी हिंदुस्थानात जर
कोणती प्रमुख भाषा असेल तर ती तामीळ होय.
"कुरल" या अलौकिक ग्रंथाचा तिरुवल्लुवर हा कर्ता. मद्रासजवळ्च्या मैलापूरचा
तो राहणारा. त्याचा काळ निश्चित नसला तरी इसवी सनाच्या पहिल्या शतकातला तो
आहे, याविषयी शंका नाही.
'शिलाप्पाधिकारम्' आणि 'मणिमेखलाइ' ह्या दुसन्या शतकात झालेल्या
ग्रंथांमध्ये कुरलचा उल्लेख आहे. पांडय राजा उग्रेपेरुवलुडी हा राज्य करीत
असता मदुरेच्या कविमंडळाने कुरल ग्रंथ प्रसिद्ध केला असे मानतात. हा राजा
एसवी सन १२५ च्या सुमारास झाला हे नक्की माहीत आहे. एका कवीने कुरल ग्रंथाची
स्तुती करताना म्हटले आहे: "पांडय राजाला उद्देशून देवी सरस्वती म्हणाली,
'मी कुरलमध्ये प्रकट झाले आहे' ". सारांश, तिरुवल्लुवर हा ग्रंथकार अठराशे
वर्षांपूर्वीचा आहे, हे निर्विवाद.
या ग्रंथकाराच्या जीवनाची फारशी
माहिती मिळत नाही. तो वल्लुवजातीचा होता असे नावावरून दिसते. "तिरु" म्हणजे
पूज्य किंवा भाक्त. तिरुवल्लुवर म्हणजे वल्लुव जातीतील महापुरुष किंवा थोर
भक्त, असा अर्थ आहे. वल्लुव जात म्हणजे अस्पश्य जात. तिरुवल्लुवर महार
जातीचा होता. या वल्लुव जातीचा धंदा म्हणजे दवंडी पिटणे, निरोप पोचविणे असा.
तिरुवल्लुवराचा पिता ब्राह्मण होता; परंतु आई महारकन्या होती. आईचे नाव "आदि".
ती महाराची होती, परंतु तिचे संगोपन एका ब्राह्मणानेच केले होते. यामुळे
आदीच्या मनावर ब्राह्मण व वैदिक संस्कृतीचे संस्कार झाले होते.
तिरुवल्लुवराच्या पित्याचे नाव भगवान असे होते.
तिरुवल्लुवराच्या लहानपणची माहिती नाही. त्याने पुढे लग्न केले. त्याची पत्नी
थोर पतिव्रता होती. बुद्ध धर्माच्या ग्रंथांतून तिरुवल्लुवर बुद्ध धर्म होता;
त्याची पत्नी सिंगापूरची; तिला बुद्धभिक्षूंनी ज्ञान दिले होते; इत्यादी
हकीकती आहेत. तिरुवल्लुवराची संसारयात्रा सुखाची असे यात शंका नाही. पति-पत्नींचे
जेत्जे प्रेम आहे, ऐक्य आहे, तेथे आनंदाला काय तोटा! तिरुवलुवर पत्नीचे
नाव वासुकी.
एके
दिचशी तिरुवल्लुवराने मूठभर नखे लोखंडाचे तुकडेयांचा भात शिजविण्यास पत्नीला
सांगितले. काहीएक शंका न घेता तिने त्या वस्तू चुलीवर चढविल्या. तिने
शिजविण्याचा प्रयत्न केला! एके दिवशी तो साधू नि तिरुवल्लुवर जेवायला बसले
होते. पत्नी वासुकी आडावर पाणी काढीत होती. भार निवालेला होता. तरी "अगं
ए, किती हा भात! हात पोळला की माझा" असे तिरुवल्लुवर ओरडला. ती साध्वी
निम्मे वर आलेली घागर तशीच एकदम सोढून धावत आली नि भातावर पंख्याने वारा
लोंबकळत राहिली!.
"कुरल" या ग्रंथामुळे तिरुवल्लुवराचे नाव अमर झाले आहे. 'ज्ञानवेट्टी'
नावाचा दुसराही एक लहानसा ग्रंथ त्या नावावर आहे, परंतु तो ग्रंथ तितकासा
महात्त्वाचा नाही.
"कुरल" ग्रंथाच्या रूपाने त्याने जगाला बहुमोल देणगी दिली आहे. तामील भाषेत
या ग्रंथाला फार मान आहे. याला 'तामील वेद' म्हणतात ते यथार्थ आहे. कुरल
ग्रंथाचे तीन भाग आहेत: प्रथम भागात धर्म; द्वितीय भागात अर्थ; तृतीय भागात
काम- असे वर्णविषय आहेत. तिरुवल्लुवराने चार पुरुशार्थांतील तीन
पुरुषार्थांचेच वर्णन केले. चौथा जो मोक्ष, त्यासंबंधी त्याने काहीएक
सांगितले नाही. तो अस्पृश्य होता म्हणून का त्याने मोक्षावर काही लिहिले
नाही? किंवा मोक्ष म्हणजे परमस्वरूपप्राप्ती; अवाङूमानसगोचर अशी ती स्थिती;
त्या स्थितीचे वर्णन तरी कसे करायचे? म्हणून यासंबंधी त्याने काही लिहिले
नसेल. किंवा प्रथम धर्मभाग म्हणून जो आहे, त्यात यति-जीवनावर
जी प्रकरणे आहेत तीच मोक्षासंबंधी, असेही कोणी मानतात.
हे तिन्ही भाग मिळून १३३ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात दहा कविता आहेत.
एकूण १३३० कविता आहेत. प्रत्येक कविता दोन चरणांची आहे. 'कुरल' या शब्दाचा
अर्थच मुळी "दोन चरणी" असा आहे. तुलसीदासाच्या "चौपाया" तशा
तिरुवल्लुवराच्या या "दुपाया" आहेत.
कुरल्मधील हे १३३० श्लोक या दुपायी वृत्तात आहेत. अतिलहान वृत्त व त्यात
गंभीर व विशाल अर्थ खच्चून भरलेला असे हे काव्य आहे. कुरलमध्ये सर्वत्र
एकप्रकारची भव्यता आहे, उदात्तता नि सहृदयता आहे. शेवटच्या प्रेमासंबंधीच्या
भागातही सद्भिरुचीस दुखवील असा एकही विचार नाही, एकही अश्लील ओळ नाही.
पहिल्या भागाला आरंभ करण्यापूर्वी चार प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात
परमेश्वराची स्तुती आहे. हे वर्णन काही ठिकाणी परमेश्वरास लगू पडते,
तर कही ठिकाणी परमेश्वरास लागू न पडता बुद्ध, महावीर यांच्या-सारख्या थोर
जगद्गुरूंस लागू पडते.
"अर्थ" विभागात राजा, त्याला लागणारे गुण, प्रधान कसे असावेत, सैन्य व शूर
लोक, हेर, मित्र कसे ओळखावे, मैत्रीचे महत्व, जुलमाचे परिणाम, शत्रूविषयी
दक्षता, अशी प्रकरणे असून पुढे कृषी, भिकारी, दान यश, कुटुंबाला मोठेपणा
मिळवून देणे, इत्यादी सुंदर प्रकारणे आहेत.
'काम'-विभाग येतो यात प्रिया नि प्रियकर यांचे वर्णन आहे. या भागात कोठेही
अश्लीलता नाही. मर्यादेच अतिक्रमण नाही. हृदयातील भाव अतिगोघ रीतीने
वर्णिलेले आहेत.
कुरलमधील सुंदर कल्पना, सुंदर उपमा, अभिनव विचार यांची उदाहरणे किती घ्यावी?
१३३० कविता म्हणजे सारे अष्टपैलू हिरे आहेत. प्रत्येक कविता म्हणजे
घासूनपुसून ठेवलेला हिरा आहे. एक शब्द कमीअधिक करता येणार नाही, इकडचा तिकडे
करता येणार नाही.
कुरल वाचून आपल्या लक्षात येईल की, भारतीय संस्कृती सर्वत्र एकच आहे. या
विशाल देशाचे हृदय एकाच रक्ताने भरलेले आहे. एकाच नाडीचे ठोके सर्वत्र
आहेत. आपण इतर प्रांतीय भाषांतील वाङ्मय वाचले म्हणजे आपणास कळून येईल की,
प्रादेशिक अंतर असले तरी मनाने आपण सारे जवळच आहोत, एक आहोत. तिरुवल्लुवर
हा केवळ तामीळनाडचा नाही, तर तो भारताचा आहे. एवढेच नव्हे तर सर्व जगाचा आहे.
सान्या मानवजातीला अन्नत करण्यासाठी त्याने लिहिले. जातीने अस्पृश्य;
धंघ्याने कोष्टी; परंतु विचारांची सोज्जवल माणिकमोती देणारा हा
तिरुवल्लुवर मन मोहून घेतो.
=============================================================
No comments:
Post a Comment